Saturday, May 9, 2026
Latest NewsPUNE

पुणे महापालिकेने निकृष्ट राष्ट्रध्वज वाटप केले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

पुणे: देशात सध्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. त्यातच आजपासून हर घर तिरंगा या मोहिमेला सुरुवात झाली असून या मोहिमेंतर्गत पुणे महापालिकेनं घरोघरी राष्ट्रध्वजाचे वाटप केले आहेत.
धनकवडी सहकारनगर या प्रभागात ५२ हजारांहून अधिक राष्ट्रध्वजांच वाटप महापालिकेनं केलं आहे. मात्र, त्यातील ४८ हजारांहून आधिक राष्ट्रध्वज निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार वसंत मोरे यांनी केली होती. पुण्यातील 15 क्षेत्रीय कार्यालयात देखील निकृष्ट दर्जाचे राष्ट्रध्वज मिळाल्याचा दावाही मोरेंनी केला होता. पुणे महानगरपालिकेकडे योग्य चौकशी करून झेंडे बनवणाऱ्या ठेकेदार आणि कंपनी विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वसंत मोरे यांनी पोलिसांकडे केली आहे. वसंत मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दिली आहे.तसेच १५ ऑगस्ट आधी या तक्रारीवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी यावेळी मोरे यांनी केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading