हर घर तिरंगा प्रभात फेरीला प्रतिसाद
पुणे : आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या पॉलिटिकल सायन्स विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ‘ हर घर तिरंगा ‘ उपक्रमाअंतर्गत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात महाविद्यालयातील सुमारे १२० विद्यार्थी, एनसीसी कॅडेट्स, १४ शिक्षक व कर्मचारी यांनी सहभाग घेतला. ही प्रभातफेरी आझम कॅम्पस, १५ ऑगस्ट चौक, कोहिनूर हॉटेल, बाबाजान चौक मार्गे घेण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने प्रत्येक नागरिकापर्यंत तिरंगा ध्वज पोहचविणे, त्याबरोबरीने ध्वजाचे पावित्र्य राखणे याबाबत जनजागृती करणे असा या प्रभातफेरीचा उद्देश्य होता, आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शैला बुटवाला यांनी सांगितले. यावेळी डॉ. वहिदा शेख, शबाना शेख, प्रा. अली मालेगावकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
