fbpx

मराठी भाषिक भवन हे पुणे शहरात विलगीकरण व्हावे; मराठी एकीकरण समितीची मागणी 

पुणे : मराठी भाषिक भवन हे विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरात विलगीकरण व्हावे, या मागणीसाठी मराठी एकीकरण समिती पुणे शहर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना निवेदन देण्यात आले.

मराठी भाषिक भवनाच्या विलगीकरणासह पुणे शहरातील प्रशासन हे मराठी पाट्यांसाठी उदासीन आहे. राज्य शासनाचा अध्यादेश असतानाही काही सुचना करताना दिसत नाहीत. त्याच बरोबर विधानसभा ही मराठी जनांचे प्रतनिधित्व करते तेथील बोलण्याची आणि कामकाजाची भाषा हि मराठी असावी, अशी मागणीही मराठी एकीकरण समितीचे पुणे शहर अध्यक्ष रवींद्र कळमकर यांनी  मांडली आहे.

यासंदर्भाचे निवेदन आज मराठी एकीकरण समितीच्यावतीने विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना देण्यात आले. यावेळी पुणे शहरातील रवींद्र नामदेव कळमकर, प्रमोद पाटील, प्रवीण शिंगाडे,राजन पंदारे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: