fbpx

शेतकरी कामगार पक्षाचे राहुल पोकळे यांचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

पुणे : शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्र कोषाध्यक्ष राहुल पोकळे यांचा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज प्रवेश झाला.

धायरी येथील राहुल पोकळे हे गेली 20 वर्षांपासून पुरोगामी चळवळीत काम करत असून अनेक सामाजिक आंदोलनात भूमिका घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. राष्ट्रसेवा समूह या संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांचे कार्य सर्वांना परिचित आहे. सामुदायिक विवाह, 300 गावात संविधान जनजागृती यात्रा, प्रबोधन शिबिरे इत्यादी अनेक उल्लेखनीय कामे त्यांनी केलेली आहेत. मागील 2 निवडणुकांमध्ये अपक्ष म्हणून झालेला निसटता पराभव हा अनेकांनी दखल घ्यायाला लावणारा होता.

 

Leave a Reply

%d bloggers like this: