fbpx

उदय सामंत हल्ला प्रकरण : हल्लेखोर राष्ट्रवादीचे असले तरी गुन्हे दाखल करा – अजित पवार

पुणे : शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर काही दिवसांपूर्वी पुण्यातील कात्रज चौकात हल्ला झाला होता. याविषयी बोलताना आज विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले की, ‘या हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज असून हल्ल्यामागे कोण आहे. याचा पोलिसांनी शोध घ्यावा. हा भ्याड हल्ला आहे. हल्ला करणारे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे असले तरीही त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, असे  अजित पवार म्हणाले.

मंत्रिमंडळाचे अधिकार सचिवांना देण्याच्या निर्णयावर अजित पवार म्हणाले, सचिवांना अधिकार द्यायचे तर चीफ सेक्रेटरींनाच अधिकार देऊन टाका ना लोकांनी निवडून दिलेल्या आमदाराला अधिकार द्यायचे नाही. मंत्री करायचं नाही. याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर द्यावे, असे कडक शब्दांत अजित पवार यांनी सुनावले.

पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात झालेल्या मुलीवर बलात्कार प्रकरणी पण अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले, बलात्कार करून त्या नराधमाने तिचा खून केला. पण त्या प्रकरणात पोलिसांना आदेश द्यायला मंत्रीच नाही. नाहीतर लवकरच कारवाई झाली असती. आज मी आणि रूपाली चाकणकर त्या ठिकाणी भेट देणार आहोत असे अजित पवार म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: