fbpx

मंत्रिमंडळाचा विस्तार दिल्लीतील सिग्नलशिवाय होईना – विरोधी पक्ष नेतेअजित पवार

पुणे : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन बराच काळ लोटला आहे. मात्र अजूनही राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे विरोधकांडून एकनाथ शिंदे गट आणि सरकारवर टीका होताना दिसत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार दिल्लीतील सिग्नलशिवाय होईना, असा टोला विरोधी पक्ष नेतेअजित पवारांनी भाजपला लगावला.

अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत तेव्हा त्यांनी पुणे पक्ष कार्यालयात प्रसार माध्यमांची संवाद साधला. सगळ्यावर शिंदे-फडणवीस सरकारकडून आम्ही दोघे आहोत, असे उत्तर दिले जाते. त्यावर अजित पवार म्हणाले,सरकार चालवणे हे काम फक्त दोघांनी करण्यासारखे आहे का? याचा विचार होण्याची आवश्यकता आहे. या दोन्ही नेत्यांनी याचे आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

पुढे ते म्हणाले, निवडणुकीसाठी सज्ज रहा. आज यांच्या हातात काहीही नाहीये, दिल्लीतून सिग्नल मिळाल्यानंतरच पुढच्या गोष्टी होणार आहेत, तोवर यांनी फक्त गप्पा मारायच्या आहेत. याआधी महाविकास आघाडी सरकारमध्ये महाराष्ट्रात आणि मुंबईत सर्व निर्णय व्हायचे,असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधलं आहे.

महत्त्वाच्या पदावर बसल्यावर तारतम्य पाळायचे असते – अजित पवार 

कायद्याचे, नियमांचे उल्लंघन होऊ देऊ नका. मुख्यमंत्री मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये गेले, तिथे घोषणा सुरू होत्या. बाकीच्या लोकांना त्याचा त्रास होतो. असे म्हणत एकनाथराव उद्धव ठाकरेंसोबत काम करताना शिस्तीने वागायचे, आता वेगळेच सुरू असल्याची टीका त्यांनी केली. 10 नंतरही त्यांचा माइक सुरू असतो. महत्त्वाच्या पदावर बसल्यावर तारतम्य पाळायचे असते,असा टोला अजित पवार यांनी शिंदेंना लगावला.

Leave a Reply

%d bloggers like this: