Big News – नॅशनल हेराल्डचे कार्यालय सील
नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालय (ED)ने कथित नॅशल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी नॅशनल हेराल्डच्या कार्यालयाला टाळे ठोकले आहे. राजधानी दिल्लीत ED)ने ही केलेली मोठी कारवाई आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी तसेच खासदार राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. याच प्रकरणात ईडीने सोमवारी नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर छापा टाकून तपास केला होता. त्यानंतर आता या कार्यालयाला टाळे ठोकण्याची कारवाई करण्यात आली आहे.
कॉँग्रेसचे उद्या (दी.4)देशव्यापी आंदोलन
ED च्या या छाप्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी नॅशनल हेराल्ड कार्यालयाबाहेर निदर्शने केली. यावेळी त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही केली. ईडीच्या कारवाईवर राहुल गांधी म्हणाले की, ‘काँग्रेस तुमच्या लोकांची आहे आणि तुम्ही काँग्रेसची ताकद आहात. हुकूमशहाच्या प्रत्येक हुकुमाशी आपल्याला लढायचे आहे’. दरम्यान, कॉँग्रेसच्या वतीने उद्या (दी.4) या कारवाईचा निषेध म्हणून देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.