बँक ऑफ इंडियाने आर्थिक वर्ष २०२२ – २३ च्या पहिल्या तिमाहीत नोंदवला
५६१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा
मुंबई : बँक ऑफ इंडियाने आर्थिक वर्ष २०२३ च्या पहिल्या तिमाहीतील आर्थिक निष्कर्षांची घोषणा केली आहे, ज्यामध्ये निव्वळ नफा ५६१ कोटी रुपये आणि संचालन नफा २,१८३ कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
ऍसेट क्वालिटी फ्रंटवर बँक ऑफ इंडियाचा जीएनपीए रेशो मागील वर्षीच्या तुलनेत ४२१ बीपीएसने वाढून जून २०२१ मध्ये १३.५१% वरून जून २०२२ मध्ये ९.३०% झाला आहे. नेट एनपीए रेशो ११४ बीपीएसने वाढून जून २०२१ मध्ये ३.३५% वरून जून २०२२ मध्ये २.२१% वर पोहोचला आहे. प्रोव्हिजन कव्हरेज रेशो (पीसीआर) ८७.९६% होता, जो मार्च २०२२ मध्ये ८६.१७% आणि जून २०२१ मध्ये ८६.१७% होता.
बँक ऑफ इंडियाचे निव्वळ व्याज उत्पन्न मागील वर्षीच्या तुलनेत २९.५१% ने वाढले आणि एनआयएम (ग्लोबल) ३९ बीपीएसने वाढले.
मागील वर्षीच्या तुलनेत बँक ऑफ इंडियाचे रिटेल क्रेडिट २२.४५% ने, ऍग्रीकल्चर क्रेडिट १६.४०% आणि एमएसएमई क्रेडिट ७.९६% ने वाढले आहे.
जून २०२२ मध्ये बँक ऑफ इंडियाच्या ग्लोबल बिझनेसमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ७.७४% ची वाढ होऊन तो ११,१८,४८१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत बँकेचा ग्लोबल ऍडव्हान्सेस १५.२०% नी वाढून जून २०२२ मध्ये ४,७७,७४६ कोटी रुपये झाला आहे. जून २०२२ मध्ये डोमेस्टिक ऍडव्हान्सेस मागील वर्षीच्या तुलनेत ९.७२% नी वाढून ४,०१,२१० कोटी रुपये नोंदवले गेले आहेत.
