Sunday, June 14, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

.. त्यामुळे शिंदे – फडणविसांनी घेतलेले निर्णय वादग्रस्त आहेत -प्रकाश आंबेडकर

पुणे : राज्यात एकनाथ शिंदे गटाचे सरकार आले.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची नव्हती तरी. त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणे भाग पडले. त्यावर विरोधी पक्षांनी टीका केली .पण देवेंद्र फडणवीस फक्त मंत्री ठरतात. घटनेप्रमाणे जोपर्यंत 12 मंत्री शपथ घेत नाहीत तोपर्यंत कॅबिनेट होत नाही. त्यामुळे या दोघांनी घेतलेले निर्णय वादग्रस्त आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

या दोघांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात कोणी कोर्टात गेले तर कोर्ट यांच्या निर्णयांना स्थगिती देऊ शकते.वंचित बहुजन आघाडी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या जास्तीत जास्त जागा लढविणार आहे. आम्ही निवडणुकांत कॉंग्रेस बरोबर युती करण्यास तयार आहोत. आम्ही कॉंग्रेसला तशी ऑफर दिली आहे. अस प्रकाश आंबेडकर म्हणाले.
16 आमदारांना अपात्र ठरवण्यावर सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत टाळाटाळ केलीय. शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या कारवाईवरील स्थगिती उठवण्याबाबत सर्वोच्च न्यायालय आता टाळाटाळ करणार नाही ही अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर हे सरकार राहिल की जाईल अशी परिस्थिती निर्माण होईल, अशीही शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading