Saturday, June 13, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

राज्यपाल कोशियारींच्या महाराष्ट्र – द्रोही वक्तव्याचा निषेध…. भाजपने महाराष्ट्राची माफी मागावी – गोपाळदादा तिवारी

पुणे – केंद्रात मोदी सरकार आल्यापासून, भाजपच्या शिर्ष नेतृत्वाकडून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या माध्यमातून महाराष्ट्रा विषयी सतत आकसभाव व दुजाभावाचे वर्तनच् दिसून आले आहे… मविआ सरकार च्या १२ ‘विविध क्षेत्रातील प्रतिनिधीं’ची विधान-परिषदेवर अखेर पर्यंत नियुक्ती न करणे, मविआ सरकारची ‘विधानसभा अघ्यक्ष निवडणुकीची मागणी’ पुर्ण न करणे,

राजभवन वर आलेल्या राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना न भेटणे, महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती व समर्थ रामदासां बाबत वादातीत वक्तव्ये करणे… सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांचे विषयी निंदनीय टिकात्मक विधाने करणे, खिल्ली ऊडवणे या गोष्टी सातत्याने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांचेकडून जाणीव पूर्वक होत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे व त्याची परीणीती म्हणून की काय महाराष्ट्रातील नागरीकांमध्ये प्रांतिक भेदभाव व विषमता दाखवण्याचा निंद्य प्रयत्न करणारे ‘घटना विरोधी व महाराष्ट्रद्रोही’ विधान राज्यपाल कोशियारी यांनी नुकतेच केले.. ‘महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या अस्मितेवर घाव घालणाऱ्या निंदनीय वक्तव्याबद्दल’ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस राज्यपाल कोश्यारींचा तीव्र निषेध करत आहे असे कॉंग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे..!

केंद्रातील भाजप सरकार हे सर्व प्रकार जाणूनबुजून दुर्लक्षित करतअसल्याचेच दिसून येते.. पुणे येथील मेट्रो च्या कार्यक्रमात मा पंतप्रधान मोदी साहेबांना तत्कालीन ऊपमुख्यमंत्री मा अजीतदादा यांनी या विषयी स्पष्टपणे सांगितले होते.. तरी देखील राज्यपाल या घटनात्मक पदावरील भगतसिंह कोशियारी नामक व्यक्ती कडून असे वारंवार होत असल्याने आता मात्र भाजप नेतृत्वाने अर्थात मोदी, शहा व नड्डा आदींनी ‘महाराष्ट्राची माफी मागावी’ अशी मागणी कॉंग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
राज्यपालांनी असली विघातक विधाने करण्यापेक्षा, जी घटनात्मक जबाबदारी त्यांची आहे त्याचे किमान पालन करून राज्यास संविधानीक स्थिर सरकार देण्याकडे अघिक लक्ष द्यावे, असा ऊपरोधीक टोला देखील गोपाळदादा तिवारी यांनी लगावला..

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading