fbpx

काय तो खेळखंडोबा लवकर सुरू करा -राजू शेट्टी

पुणे : राज्यात शिंदे गट भाजपचे सरकार सत्तेवर आले आहे. अजूनही मंत्रिमंडळ विस्तार हा झाला नाही त्यामुळे सामान्य नागरिकांची कामे भरपूर अडकून पडली आहेत. विरोधी पक्ष पण मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही हा प्रश्न विचारत आहे. त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही म्हणून. हे सरकार किती दिवस टिकणार . हा एक प्रश्न राजाच्या नागरिकांना व विरोधी पक्षांना पडलेला आहे. त्यावर आज मंत्री मंडळाचा विस्तार झाला नाही म्हणजे अजून त्यांच्या वाटण्या व्यवस्थित झाल्या नाहीत; काय तो खेळखंडोबा लवकर सुरू करा. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व राजू शेट्टी यांनी पुण्यात एका कार्यक्रमाला आले असता पत्रकारांशी बोलताना केली.

राज्यात दोन महिने झाले घाणेरडे राजकारण सुरू झाले आहे. एकमेकातले पक्षातले आमदार एकमेकांवर घाणेरड्या प्रकाराचे आरोप करत आहेत. त्यावर राजू शेट्टी म्हणाले,राजकारणी हे राजकारण कुठे घेऊन चाललेत.सर्वसामान्य लोकांना याचा किळस यायला लागलाय. असे राजू शेट्टी म्हणाले.
अधीर रंजन चौधरी यांच्या नकळत झालेल्या वक्तव्यावर हा गदारोळ चालू होता.परंतु स्मृती इराणी ने आपल्या नेत्या मा सोनिया जी गांधी यांच्या विरुध्द त्यांनी घोषणा चालू केल्या, अगदी खालच्या पातळीवर जाऊन गोंधळ घातला. माफी मांगो सोनिया गांधी असे हातवारे करीत पूर्ण सदन डोक्यावर घेतले होते. त्यावर राजू शेट्टी म्हणाले,
महिला खासदारांचे कपडे फाडण्याची भाषा केली जाते. ही भाषा एकदम चुकीचे आहे. संसदेत गदारोळ न घालता. नागरिकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत असे राजू शेट्टी म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: