fbpx

BSNL – सर्व युनियन आणि असोसिएशनच्या वतीने  निदर्शने 

पुणे : BSNL मध्ये कार्यरत असलेल्या सर्व युनियन आणि असोसिएशन AUAB यांनी देशभर काळी फीत लावून निदर्शने आवाहन आयोजित केले. बी.एस.एन.एल.चे १४९१७ मोबाईल टॉवर्स नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईन अंतर्गत खाजगीकडे सोपविण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करत आणि बी.एस.एन.एल.ची 4G सेवा त्वरित चालू करण्याची मागणी करत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

राष्ट्रीय मुद्रीकरण पाईपलाईन थांबवा २०२१-२२ घ्या राष्ट्रीय अर्थसंकल्पात सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की बी.एस.एन एल. आणि एम.टी.एन. एल. चे मोबाईल टॉवर आणि ऑप्टिक फायबर(OFC) खाजगीकडे सुपूर्द करून ४०,००० कोटी रुपये मिळविणे या अनुषंगाने आता सरकारने बी.जस.एन.एल. चे १४९१७ मोबाईल टॉवर्स खाजगी कंपनीला देण्याचा निर्णय घेतला आहे.नॅशनल मॉनोटायझेशन पाईपलाईन नुसार बी.एस.एन.एल. चे आणखी टॉवर्स आणि ऑप्टिक फायबर येत्या काही दिवसांत खाजगी कडे सुपूर्द केले जातील.सरकारच्या या निर्णयामुळे बी.एस.एन.एल.ला नक्कीच मार बसणार आहे.जर बी.एस.एन.एल.आणि ऑप्टिक फायबर(OFC) खाजगी कडे सुपूर्द केले तर बी.एस.एन.एल.ला स्वता:चे टॉवर्स आणि ओएफसी(OFC) वापरण्यासाठी खाजगीला पैसे द्यावे लागतील.सरकारच्या बी.एस.एन.एल. विरोधी आणि खाजगी समर्थक धोरणामुळे निर्माण आर्थिक संकटामुळे आधीच लंगडत असलेल्या बी.एस.एन.एल.ला मोठा धक्का बसेल.म्हणून AUAB ची मागणी आहे की राष्ट्रीय मुद्रीकरण पाईपलाईन अंतर्गत बी.एस.एन.एल.चे टॉवर्स आणि ऑप्टिक फायबर खाजगी कडे सोपविण्याचा प्रस्ताव ताबडतोब मागे घ्यावा.बी.एस.एन.एल.च्या 4G लॉन्चिंग मध्ये निर्माण झालेले रोडब्लॉक्स काढा अशावेळी जेव्हा खाजगी कंपन्या त्यांची 4G सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहेत तेंव्हा बी.एस.एन.एल.ची सेवा सुरू करणे कुठेच दिसत नाही.बी.एस.एन.एल.ला 4G उपकरणे पुरवण्यासाठी सरकारने ओळखलेल्या TSC ने संकल्पनेचा पुरावा (PoC) देखील पूर्ण केलेला नाही. TSC ची PoC पूर्ण करण्याची मूळ अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२१ होती.ही मुदत अनेक वेळा वाढविण्यात आलेली आहे. तथापी TCS आजपर्यंत PoC पूर्ण करू शकले नाही.याचा अर्थ TSC हे सिद्ध करू शकले नाही का बी.एस.एन एल.ला 4G उपकरणे पुरवण्याचे तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे.बी.एस.एन.एल.ने ६४०० (BTS) बेस ट्रांनसीव्हर स्टेशनस खरेदी करण्यासाठी आधीच त्याची खरेदी ऑर्डर दिली आहे.तथापी आत्तापर्यंत TSCने बी.एस.एन.एल.ने दिलेली खरेदी ऑर्डर स्वीकारलेली नाही …. हे लक्षात घेतले पाहिजे की TSC ने भी. एस.एन.एल.ला एक लाख 4G BTS पुरविण्याचे वचन दिले आहे तथापि TSC हे कसे आणि केव्हा पूर्ण करणार हे कोणालाच माहिती नाही.

बी.एस.एन.एल.ला त्यांची 4G सेवा सुरू करता आली नसल्यामुळे तिचे ग्राहक गमावू लागले आहेत.,एकट्या मे २०२२ मध्ये बी.एस.एन.एल.ने ५.३ लाख ग्राहक गमावले आहेत.बी.एस.एन.एल.चे पुनरुज्जीवन‌ पॅकेज केवळ‌ कागदावरच राहिले आहे. बी.एस.एन.एल.ची 4G सेवा उपलब्ध नसल्यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती झपाट्याने खालावत चालली आहे.म्हणून AUAB ने २८/७/२०२२ रोजी बी.एस.एन.एल. चे टॉवर्स आणि OFC खाजगी कडे देण्यास विरोध करत लंच अवर मध्ये ब्लॅक बॅच (काळी फीत) लावून निदर्शने करण्यात आली आणि बी.एस.एन.एल.चे 4G सेव त्वरित सुरू करण्यासाठी सरकारने आणि व्यवस्थापनाने अर्थपूर्ण कारवाई करण्याची मागणी केली आहे.या निदर्शनाचे आयोजन सर्व युनियन आणि असोसिएशनचे वतीने केले.या निदर्शनाचे प्रास्ताविक कॉम्रेड विकास कदम यांनी केले.तसेच कॉ.युसुफ जकाती, कॉ .एस. पी सोनावणे,कॉ वी .बी. नारायणकर, उल्हास जावळेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश भोज यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप गुळुंजकर यांनी केले

Leave a Reply

%d bloggers like this: