fbpx

टाटा पॉवर आणि एला फाऊंडेशनने त्यांचे चौथे पुस्तक प्रकाशित केले: “ऍम्फिबियन्स ऑफ द नॉर्दन वेस्टर्न घाट्स”

पुणे : जैवविविधता सीरिज आणि निसर्ग संवर्धन उपक्रमांचा एक भाग म्हणून टाटा पॉवरने एला फाऊंडेशनच्या सहयोगाने आपले चौथे पुस्तक “ऍम्फिबियन्स ऑफ द नॉर्दन वेस्टर्न घाट्स” प्रकाशित केले आहे. गुजरात, दीव, दमण, दादरा नगर हवेली, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये आढळणाऱ्या सर्व ५२ उभयचर प्रजातींविषयी माहिती देणारे हे पहिले अस्सल फोटोग्राफिक गाईड आहे.  टाटा पॉवरचे जनरेशन विभागाचे प्रमुख श्री. विजय नामजोशी यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.  यावेळी हायड्रो विभागाचे प्रमुख श्री. प्रभाकर काळे, सिव्हिल अँड इस्टेट्स विभागाचे प्रमुख श्री. पराग राईलकर आणि टाटा पॉवर व एला फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

टाटा पॉवर आणि एला फाऊंडेशनने एकत्रितपणे प्रकाशित केलेले हे पुस्तक डॉ. सतीश पांडे यांनी लिहिले असून श्री. विवेक विश्वासराव व प्रो. ग्राम पुरोहित यांच्याकडून मिळालेल्या बहुमोल माहितीचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे

टाटा पॉवरचे जनरेशन विभागाचे प्रमुख श्री. विजय नामजोशी यावेळी म्हणाले, “व्यावसायिक स्तरावरील शास्त्रोक्त अभ्यासातून जैवविविधता समजून घेणे हे जैवविविधतेच्या संवर्धनाच्या दिशेने उचलावयाचे पहिले महत्त्वाचे पाऊल आहे. देशभरातील आपल्या सर्व प्रकल्पांच्या, कामांच्या ठिकाणी आजूबाजूच्या जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन यशस्वीपणे करण्याच्या परंपरेचे पालन टाटा पॉवर प्रदीर्घ काळापासून करत आहे. आमच्या सर्व हितधारकांसाठी दीर्घकाळपर्यंत लाभकारी ठरत राहील असे अधिक जास्त शाश्वत, स्थिर आणि पर्यावरणपूरक संचालन निर्माण करण्याच्या आमच्या व्यापक ईएसजी आदेशाचा देखील हा एक भाग आहे. भविष्यात देखील आम्ही अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये गुंतवणूक करून त्यांना पाठिंबा देत राहू.”

टाटा पॉवरच्या हायड्रो विभागाचे प्रमुख  प्रभाकर काळे यांनी यावेळी सांगितले, “हे पुस्तक संशोधक, शिक्षक व विद्यार्थ्यांना त्यांच्या संवर्धन प्रकल्पांमध्ये खूप उपयोगी ठरेल.  तसेच उभयचरांचे नैसर्गिक अधिवास असलेल्या पाणीसाठ्यांचे संरक्षण करण्यात देखील याची मोठी मदत होईल.”

एला फाऊंडेशनचे संचालक डॉ. सतीश पांडे म्हणाले, “हे अशाप्रकारचे पहिलेच पुस्तक असून आजवर दुर्लक्षित राहिलेल्या प्राण्यांचे संवर्धन करणे हा यामागचा उद्देश आहे.”

टाटा पॉवर आणि एला फाऊंडेशन यांनी महाराष्ट्रातील पश्चिम घाटांमधील समृद्ध जैवविविधतेचे ठळकपणे दर्शन घडवण्यासाठी प्रकाशित केलेल्या शृंखलेतील ही अजून एक आवृत्ती आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: