Wednesday, June 10, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सुषमा अंधारे यांचा शिवसेनेत प्रवेश; लगेच मिळाले पद

मुंबई:  फुले-शाहू- आंबेडकरांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या आंबेडकरी चळवळीच्या  कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेच्या नेत्या व उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे त्यांनी सुषमा अंधारे यांना शिवबंधन हातात घातले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर उपनेतेपदाची जबाबदारी सोपवली. त्यांनी शिवसेना पक्षाच्या पडत्या काळात त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे रहाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला होता. त्यांनी त्यावेळी ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या सभा गाजवल्या होत्या. 2019 च्या निवडणुकीत त्या राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक होत्या.
सर्व पार्श्वभूमिवर सुषमा अंधारे माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, संविधनिक चौकट मानणारे धर्मनिर्पेक्ष लोक, झुंज देणाऱ्या उद्धवजी सोबत असले पाहिजेत. माझी पाटी कोरी आहे, माझ्यावर कोणत्याही केसेस नाहीत. अशा सुषमा अंधारे म्हणाल्या
भाजपवाल्यांना माझ्यावर अटॅक करण्याची संधी मिळणार नाही. मी कोणत्याही आमिषाला जाऊन हा निर्णय घेतलेला नाही. माझी सद्सद्विवेक बुध्दी जागी ठेऊन हा निर्णय घेतला आहे. तुमचा सो कॉल्ड हिंदुत्ववाद हा केतकी, कंगना, नुपूर शर्माचा भंपक आहे. मला आंनद आहे की, माननीय उद्धव ठाकरे या भ्रमात नाही.
या परिस्थितीत मला असे वाटते, शिवसेनेला माझी गरज आहे आणि महाराष्ट्राला शिवसेनेची गरज आहे. हा महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर कधी झुकला नाही झुकणार नाही, ही मान ताट ठेवण्यासाठी हा पक्ष प्रवेश करणार असल्याचं सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading