Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘बस बाई बस’च्या मंचावर उलगडणार खासदार सुप्रिया सुळे यांचा जीवन प्रवास 

“मी घेऊन येतोय महिलांसाठी खास राखीव बस”, असं सुबोध भावेने म्हणताच संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरु झाली ती म्हणजे ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची. या बसमध्ये चढणारं पहिलं सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे खासदार सुप्रिया सुळे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात खासदार सुप्रिया सुळे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. सुबोध भावे आणि त्याचसोबत कार्यक्रमातील महिला मंडळ सुप्रिया सुळेंचा जीवन प्रवास उलगडणार आणि त्यांना पेचात टाकणारे काही प्रश्न देखील विचारताना दिसणार आहेत.
या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांच्याबद्दल जाणून घेताना एक गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल ते म्हणजे सुप्रिया सुळे या खूप चांगलं गुजराती देखील बोलतात. या भागात काही राजकारण्यांचे फोटो दाखवून सुप्रिया ताईंना त्यांच्याशी संवाद साधण्यास सांगितलं असताना मोदींजींच्या फोटो सोबत त्यांनी चक्क गुजरातीमध्ये संवाद साधला. त्यांना अस्खलित गुजराती बोलता येतं हि गोष्ट कदाचित खूपच कमी लोकांना माहित असावी. अशाच प्रकारे सुप्रिया ताईंबद्दल अजून गोष्टी जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका बस बाई बस शुक्रवार २९ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading