fbpx

रणवीर सिंह वर गुन्हा दाखल करावा मनसेची मागणी

पुणे: अभिनेता रणवीर सिंह याने नग्न फोटोसेशन केल्यानंतर त्याच्यावरती समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात सुद्धा होते तसेच मुंबईमध्ये त्याच्या विरोधामध्ये आता गुन्हा देखील दाखल झालेला आहे मुंबई नंतर आता पुण्यात देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसेने केली आहे.
पुण्यात यापुढे रणवीर सिंहाचा एकही चित्रपट आम्ही प्रदर्शित होऊ देणार नाही त्याने माफी मागावी एकीकडे आपल्या फॉलोवर्स वर्ग जो आहे तो 15 ते 60 वर्ष आहे मग त्याने काय याचे उघडे नागडे चित्र बघावे का अशी टीका मनसेने केली.


रणवीर सिंह यांनी केलेले प्रत्यय हे हिंदू विरोधी आहे हिंदूच्या संस्कृतीच्या वर्तनाविरुद्ध आहे ज्या अभिनेत्याने पेशव्यांची भूमिका केली पेशवे हे आदर्श आहेत त्याच अभिनेत्यांना असं वर्तन करणं चुकीचं आहे
रणवीर सिंह हा एक अभिनेता आहे तो काय स्टॅचू किंवा शिल्प नाही ज्या कलाकृती मधून उघडे नागडे प्रदर्शन करावे आपल्या वर्तनातून समाजामध्ये कुठेही द्वेष न होता आणि वाईट वर्तणूक करावी असा संदेश जाऊ नये यासाठी त्वरित रणवीर सिंह माननीय राज साहेब ठाकरे आणि मनसेची जाहीर माफी मागावी अन्यथा यापुढे आम्ही रणवीर सिंह चा एकही चित्रपट पुण्यात प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा देतो असे मनसेचे अध्यक्ष निलेश काळे यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण शारीरिक सेनेच्या वतीने पुण्याच्या पोलीस आयुक्तांना एक निवेदन देण्यात आलेल आहे. त्यामध्ये रणवीर सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली तात रणवीर सिंह च्या वर्तनाने हिंदूंच्या भावना दुखवतात हिंदूंच्या लहान मुलांनी असे उघडे नागडे चित्र बघावे का असा प्रश्नही यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेने हे अध्यक्ष निलेश काळे केला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: