fbpx

११ हजार कोटी रुपये खर्चूनही गंगा नदी प्रदुषित का? – वरुण गांधी

नवी दिल्ली  : भाजपा खासदार वरुण गांधी यांनी ‘नमामी गंगा मोहिमे’वरुन केंद्र सरकारवरच टीका केली आहे. ११ हजार कोटी रुपये खर्च करुनही गंगा नदी प्रदुषित का आहे? याला जबाबदार कोण असा सवाल वरुण गांधी यांनी विचारला आहे. याबाबत ट्वीट करत त्यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.

‘गंगा आपल्यासाठी फक्त नदी नाही तर ‘आई’ आहे. आई गंगा करोडो देशवासीयांच्या जीवनाचा, धर्माचा आणि अस्तित्वाचा आधार आहे. त्यामुळे नमामी गंगेसाठी २० हजार कोटी रुपयांचे बजेट पास करण्यात आले होते. आतापर्यंत ११ हजार कोटी रुपये खर्च करूनही नदीचे प्रदूषण का होत आहे? असा सवाल वरुण गांधी यांनी विचारला आहे. ट्वीटमध्ये त्यांनी एक व्हिडिओही जोडला आहे. या व्हिडिओमध्ये गंगेत मृत्युमूखी पडलेल्या मासे दाखवण्यात आले आहेत. ‘गंगा ही जीवनदाता आहे, मग दूषित पाण्यामुळे मासे का मरतात? ही जबाबदारी कुणाची?’ असेही वरुण गांधींनी विचारले आहे.

महत्वाचं म्हणजे बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन वरुण गांधी काही काळापासून आपल्याच पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहेत. गंगेच्या प्रदुषाबाबत केलेल्या ट्वीटनंतर वरुण गांधी चांगलेच चर्चेत आले आहेत. अनेक युजर्सने वरुण गांधींच्या या ट्वीटला रीट्वीट केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: