Thursday, June 25, 2026
Latest NewsPUNE

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवजात शिशूंना किटचे वाटप

पुणे : मातोश्री मीनाताई माता बालसंगोपन योजनेअंतर्गत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रसूतीसाठी आलेल्या मातांकरीता मोफत शंभर शिशू किट चे वाटप पुणे उपशहर प्रमुख आनंदशेट गोयल यांच्या वतीने महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती आणि शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कमला नेहरू हॉस्पिटल सोबतच ससून रूग्णालय आणि इतर ठीकाणी देखील या किटचे वाटप करण्यात येणार आहे. उद्धव साहेबांच्या शुभेच्छा जनसामान्यांपर्यंत पोहचाव्या याठी त्याच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम पुणे शहर आणि राज्यभर राबविले जात आहे; असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

आाज पुण्यातील कमला नेहरू हॉस्पिटल मधील स्री रोग व प्रसूति विभागातील वैद्यकीय अधिकारी व डॉक्टरांच्या सल्ल्याने करण्यात आलेल्या कीट वाटपा प्रसंगी आयोजक उपशहर प्रमुख आनंद गोयल, शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकूडे, गटनेते पृथ्वीराज सुतार, उपशहर प्रमुख प्रशांत राणे, संघटक राजेंद्र शिंदे,पाला मोरे, ज्ञानेश्वर पोळ, राहूल शेंडगे, अमोल घुमे, कविता आंब्रे, अनिता परदेशी, जयश्री जाधव, अमृता घुमे, अविनाश भरळ,पुनम ठाकूर, सुनिता वाघचौरे, नसिंग शेख, ममता बस्पे आदी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading