सोनिया गांधी यांना ईडी चौकशीसाठी बोलावल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचा सत्याग्रह
पुणे : राजकारणातील अनेक रथीमहारथींवरील कारवाईनंतर आता ईडीने काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे मोर्चा वळवला आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात झालेल्या मनी लाॅंन्डरींगबाबत चौकशी करण्यासाठी सोनिया गांधी यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे .असून गांधी आज इडीसमोर हजर राहणार आहेत. त्या निषेधार्थे आज काँग्रेस अख्ख्या राज्यभर शांततापूर्ण सत्याग्रह करून निषेध आंदोलन करत आहे. हे शांततापूर्ण सत्याग्रह आंदोलन पुण्यात सुद्धा करण्यात आले.
पुण्यात देशभक्त केशवराव जेधे पुतळा, स्वारगेट, येथे हे शांततापूर्ण सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. या शांततापूर्ण सत्याग्रह आंदोलनाचे नेतृत्व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले. या शांततापूर्ण सत्याग्रह आंदोलनाला, माजी महापौर कमल व्यवहारे, संगीता तिवारी, माजी आमदार मोहन जोशी, नगरसेवक आबा बागुल, काँग्रेसचे माजी अध्यक्ष रमेश बागवे व पुणे शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अरविंद शिंदे म्हणाले,केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय तपास यंत्रणेचा हुकूमशाही पद्धतीने वापर करून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावले आहे. केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून जे विरोधी पक्षातील नेत्यांना वेगवेगळ्या प्रकरणात अडकून ईडी च्या कार्यालयात चौकशीसाठी साठी बोलवत आहे. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांना कुठलीही चूक नसताना नॅशनल हेराल्ड प्रकरणात झालेल्या मनी लाॅंन्डरींग प्रकरणात अडकवले आहे. याचा आम्ही निषेध करत आहोत. सोनिया गांधी यांच्यावर जर नॅशनल हेराल्ड प्रकरणात झालेल्या मनी लाॅंन्डरींग प्रकरणात कोणतीही चूक नसताना जर मोदी सरकारने कारवाई मागे घेतली नाही. तर येथील पुढील काळात आम्ही आंदोलन करतच राहू असे अरविंद शिंदे म्हणाले.
