fbpx

‘दहशतीच्या मार्गाने’ सावरकरांचे स्मरण देणार काय…? शालेय विद्यार्थ्यां समोरील दहशतीची भाषा व संस्कारांचा तीव्र निषेध…! ⁃ काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारीं

पुणे :  ‘पोंक्षे मध्ये नथुराम गोडसे प्रवृत्तीचा’ डीएनए आलाय का…? ‘दहशतीच्या मार्गाने’ सावरकरांचे स्मरण देणार काय…? असे ऊपरोधीक सवाल ऊपस्थित करत ‘शालेय विद्यार्थ्यां समोर’ वापरलेली दहशतीची भाषा व दहशतीचे संस्कार देणाऱ्या अभिनेता शरद पोंक्षे यांचा तीव्र धिकाःर व निषेध काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.. या प्रसंगी शहर काँग्रेस अघ्यक्ष अरविंद भाऊ शिंदे व पदाधिकारी ऊपस्थित होते..!

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने ‘डेक्कन एज्यु सोसा.च्या मा स गोळवलकर प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या’ स्वातंत्र्य सेनानी वि दा सावरकरांवरील कार्यक्रमाच्या निमित्ताने नाट्य अभिनेता शरद पोंक्षे यांनी “सावरकरांची दहशत वाढली पाहीजे” असे ऊदगार काढून काँग्रेस नेतृत्वा विषयी टोमणे मारत अपमानकारक मुक्ताफळे ऊधळली.. त्यावर प्रतिक्रिया पर काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी पुणे शहर काँग्रेस अघ्यक्ष अरविंद शिंदे यांचे समवेत पत्रकार परीषद घेतली होती.

सावरकरांची दहशद का वाढली पाहिजे…(?) त्याशिवाय त्यांना लोकमान्यता वा बहूमान्यता मिळणार नाही का ? हे सतत जाणवते आहे काय…? असे सवाल गोपाळ तिवारी यांनी या परीषदेत केले.. तर अभिनेता शरद पोंक्षे हे नथुराम गोडसे याची भूमिका करता करता त्यांच्या प्रवृत्तीचा अतिरेकी डीएनए देखील पोंक्षेमध्ये आला आहे का ? असा खोचक सवाल देखील तिवारी यांनी केला. दहशदवादी विचारसरणी मुळात ‘फॅसिस्ट विचारसरणीची’ द्योतक आहे आणि त्याच विचारसणीतून सावरकर थोपवू पाहत आहात का..? असे संबोधून, एकेकाळच्या हिंदू महासभेच्या वि दा सावरकरांचं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काय व कशा प्रकारचे नाते संबंध होते, याचा इतिहास साक्ष आहे. सावरकरांच्या राष्ट्रीय संघर्षाविषयी आमचं दुमत नाही. त्यांचे स्मरणार्थ पोस्टाचे तिकीट काँग्रेसच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदीराजींनीच् काढले होते.. मात्र भाजपने सावरकरांसाठी काय केले..(?) असा थेट सवाल गोपाळ तिवारी यांनी केला आहे. पोंक्षेच्या वक्तव्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो असे देखील तिवारी म्हणाले.

काय म्हणाले होते शरद पोंक्षे ?
या एवढ्या कार्यक्रमापुरते नका थांबू, सावरकर हे फार मोठे माणूस होऊन गेले मात्र आता सावरकर यांची दहशत वाढली पाहिजे. यापुढे सावरकरप्रेमी आला म्हटलं की, दहशत वाढली पाहिजे असे वक्तव्य शरद पोंक्षे यांनी काल वरील कार्यक्रमात केले होते.

शहर काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अरविंद  शिंदे हे म्हणाले की, “एक व्यावसायिक नाटककाराने आपल्या वैचारिक दारिद्र्याचे प्रदर्शन केले असुन, आपल्या मुलीस मात्र शिक्षणासाठी परदेशात पाठवतो आणि इथल्या बहुजन पोरांना सावरकरांची दहशत दाखवायला सांगतो” या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो, असे काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंदभाऊ शिंदे म्हणाले. सावरकरांचा इंग्रजांप्रती माफीनामा व नेहरू गांधी घराण्याचे त्याग व योगदान ही तुलनाच होऊ शकत नसल्याने पोंक्षे यांनी माफी मागावी असे स्पष्ट केले..! शरद पोंक्षे यांनी काँग्रेस नेतृत्वाबद्दल वापरलेले शब्द मागे घेतले नाही तर त्यांना पुण्यात कार्यक्रम करताना काँग्रेसच्या रोषाला सामोरे जावे लागेल. व्यवसायिक नाटकाराने आपली सीमा ओळखावी आणि नाही त्या भानगडीत पडू नये येणाऱ्या काळात आम्ही त्यांना जशास तसे उत्तर देऊ. आता आम्हाला जास्त बोलायला लावू नका आम्ही जर बोलायला लागतो तर सगळी चिरफाड करू मग माफीविरापासून आजपर्यंत सगळं बाहेर निघेल असा थेट इशाराच अरविंद शिंदे यांनी शरद पोंक्षे यांना दिला आहे..!

Leave a Reply

%d bloggers like this: