fbpx

शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी विरुद्ध केलेल्या व्यक्तव्याचा जाहीर निषेध – अरविंद शिंदे

पुणे : काही वर्षापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्यावर टिका केली होती. त्यानंतर राहुल गांधींवर सावरकर प्रेमींनी जोरदार हल्लाबोल करत राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन केले होते. सावरकर विचारसरणींच्या लोकांच्या मनात अजून सुद्धा राहुल गांधींची टिका ताजी आहे, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा काल पुण्यात पाहयला मिळाला. लहान मुलांना सावरकर समजले पण त्या दिल्लीतल्या घोड्याला सावरकर कळाले नाहीत, अशी जहीर टीका अभिनेते शरद पोंक्षे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे नाव न घेता केली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष शरद पोंक्षे यांच्याविरुद्ध चांगलाच आक्रमक झालेला दिसून येत आहे. त्यावर आज पुण्यात काँग्रेस पक्षांने पत्रकार परिषद घेऊन शरद पोंक्षे यांना उत्तर दिले.
पुण्यातील पत्रकार परिषदेत काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे. राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी आदि उपस्थित होते.  

शिंदे म्हणाले,शरद पोंक्षे तुम्ही एक अभिनेते आहात .तुम्हाला अशी भाषा शोभत नाही. तुम्ही जे राहुल गांधी यांच्या विरुद्ध जे वक्तव्य केले आहे त्याचा आम्ही निषेध करत आहोत. शरद पोंक्षे तुम्ही तुमची सीमारेषा ओळखून बोलावे इथून पुढे जर तुम्ही असे वक्तव्य केले तर आम्ही तुम्हाला जशाच्या तसे उत्तर देऊ. तुम्ही सन्मानाने बोलला तर आम्ही तुमचा त्या पद्धतीने सन्मान करू. जर ब ची भाषा वापरली तर आम्ही क च्या भाषेत बोलू. असे अरविंद शिंदे म्हणाले. 

गोपाळदादा तिवारी म्हणाले, या आधीही शरद पोंक्षे यांनी असे वक्तव्य केले होते‌. त्यांना आम्ही उत्तर दिले होते. द्या सावरकरांची तुम्ही भीती दाखवता. त्या नेहरूंच्या मुलाबद्दल तुम्ही घाणेरडे वक्तव्य करता. त्या नेहरूंनी भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून लढा दिला. त्यांनी आपली स्वतःची जमीन ही स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतासाठी दिली. आम्ही आजही
भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून शरद पोंक्षे यांचा एक ज्येष्ठ अभिनेते म्हणून आदर करत आहोत. जर येथील पुढील काळात त्यांनी पुण्यात कार्यक्रम घेतला तर त्यांना आम्ही उत्तर देऊ .असे गोपाळ दादा तिवारी म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: