fbpx

खेळाडूवर कोणी हक्क गाजवू शकत नाही ते विश्वातील प्रत्येकाचे आहेत – डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे : कला, साहित्य आणि खेळाडूंना जात, धर्म नसतो. खेळाडूवर कोणी हक्क गाजवू शकत नाही ते विश्वातील प्रत्येकाचे आहेत. ऑलिंपिक सारख्या स्पर्धेत आपल्या शेजारील चीन हा देश जागतिक पातळीवर अनेक पदके पटकावित आहे, परंतु आपल्या देशाची म्हणावी तशी प्रगती नाही. सध्या काही खेळाडू उत्तम कामगिरी करत देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. हे प्रमाण वाढणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

कॅम्प येथे  महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा आणि ग्लोबल फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या बॉक्सिंग स्पर्धेतील खेळाडूंच्या विशेष गौरव समारंभात ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रीय युवा बॉक्सिंग स्पर्धेत उत्तुंग कामगिरी केलेल्या आब्बास साबुनी यांचा गौरव डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर गौरव गोसावी, सलमान शेख (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) विजय यादव (शिवछत्रपती पुरस्कार विजेते, इंडियन रेल्वे) आदी खेळाडूंचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे कॅप्टन गोपाल देवांग (अर्जुन पुरस्कार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते) कविवर्य उद्धव कानडे (अध्यक्ष, म. सा. क. प्र. सभा) सचिन ईटकर (कार्याध्यक्ष), महेंद्र रोकडे ( माजी सहायक पोलीस आयुक्त, अध्यक्ष, ग्लोबल फाऊंडेशन) रवींद्र डोमाळे (उपाध्यक्ष), डॉ. संभाजी मलघे (विश्वस्त), मोहम्मद अली साबुनी, रेश्मा साबुनी, झुबेर शेख, फिरोझ पंडोल, नाजिरुद्दीन सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.

माजी सहायक पोलीस आयुक्त महेंद्र रोकडे म्हणाले, आज देशात तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या तरुणांनी विविध खेळांमध्ये सहभागी व्हावे. यामधून जास्तीत जास्त चांगले खेळाडू निर्माण होतील आणि देश घडण्यास मदत होईल. या पार्श्वभुमीवर ग्लोबल फाऊंडेशन संस्थेच्या वतीने शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील.

कविवर्य उद्धव कानडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले तर माजी सहायक पोलीस आयुक्त महेंद्र रोकडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: