fbpx

पीएमआरडीए तर्फे पालिकेकडे ४३७ भूखंड हस्तांतरित


पुणे:पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या ३४ गावांमधील अंतर्गत रस्ते, DP/ RP रोड व सुविधा क्षेत्राचे ४३७ भूखंड
पीएमआरडीए कडून पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. 

शासनाच्या नगर विकास विभागाकडील दि.०४.१०.२०१७ च्या शासन निर्णयान्वये पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेली ११ गावे (लोहगाव (उर्वरित), मुंढवा (उर्वरित केशवनगर), हडपसर (संपूर्ण साडे सतरा नळी), शिवणे (संपूर्ण उत्तमनगर) शिवणे, आंबेगाव खुर्द, उंड्री, धायरी, आंबेगाव बुद्रुक, फुरसुंगी व उरुळी देवाची) व दि.३०/०६/२०२१ रोजीच्या अधिसूचनेद्वारे पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेली २३ गावे (म्हाळुंगे, सुस, बावधन बु., किरकिटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बु., नऱ्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी व वाघोली) पीएमआरडीए कडून हस्तांतरित केलेले अंतर्गत रस्त्याचे १०१ भूखंड, प्रादेशिक योजना व विकास आराखड्यातील रस्ते व सुविधा क्षेत्राचे प्रत्येकी १६८ भूखंड असे एकूण ४६७ भूखंड पुणे महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात आले आहेत. तसेच पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या ११ गावांच्या संचिका या पूर्वीच मनपा कडे वर्ग करण्यात आल्या आहेत.


वर्ग केलेल्या प्रकरणांचा तपशील खालीलप्रमाणे
अ.क्र. तपशील एकूण भूखंड क्षेत्र चौ.मी. मध्ये
१ अंतर्गत रस्ते १०१ ११५९५०.२०
२ DP/ RPरोड क्षेत्र १६८ १६३१७२.६९
३ सुविधा क्षेत्र १६८ २३७३४८.३६

Leave a Reply

%d bloggers like this: