fbpx

फडणवीसांचा शपथविधी बेकायदेशीर ? राष्ट्रपतींना पत्र

मुंबई : राज्यातील नाट्यमय सत्तांतरानंतर शिंदे फडणवीस सरकारचा शपथविधी झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेली ‘शपथ’ ही घटनाबाह्य, बेकायदेशीर आहे. ही शपथ देतांना घटनेच्या 164(1) ,164 (3) कुठल्याही कलमात बदल केलेला नाही. त्यामुळे हा शपथविधी घटनेचे उल्लंघन करणारा आहे. घटनेच्या पावित्र्य्याशी छेडछाड करणारा आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते संजय लाखे पाटील यांनी केला. याबाबत त्यांनी राज्यपाल तसेच राष्ट्रपतींना ईमेल द्वारे पत्र लिहुन, योग्य कारवाईची मागणी केली आहे.

याबाबत मी माननीय राज्यपाल यांना सोबत जोडलेले स्पष्ट निवेदन मेल द्वारे पाठवले आहे. त्यांनी राजिनामा द्यावा अशी मागणी केलेली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांना कार्यमुक्त करत त्यांचे सर्व निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच माननीय राष्ट्रपती यांना माझे सदरील सवित्तर निवेदन पाठवले व मा. राज्यपालांच्या घटनाबाह्य कृत्याची गंभीर नोंद घेऊन, तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

राज्य मंत्रिमंडलांचा 30 जून रोजी शपथविधी झाला. यावेळी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. राज्य मंत्रिमंडळाला राज्यपाल शपथ देत असतात भारतीय घटनेच्या कलम 164/3 नुसार कर्तव्य आणि गुप्ततेची शपथ राज्यपाल देतात. तर घटनेत कशी शपथ द्यायची आणि घ्यायची हे देखील नमूद केलं आहे. घटनेचं कलम 164/3च्या अन्वये तिस-या श्येड्यूलमधील कलम V आणि Vi प्रमाणे शपथेचा फॉरमॅट ठरलेला आहे. त्यात कोणताही शब्द घालता येत नाही आणि वगळता ही येत नाही. कसलाच बदल करता येत नाही. परंतु मा.राज्यपाल यांनी फडणवीस यांना मंत्री म्हणून नव्हे, तर उपमुख्यमंत्री म्हणून शपथ दिली.

राष्ट्रपतीं फडणवीस यांनीही ‘ ऊपमुख्यमंत्री’ असेच वाचन करत शपथ घेतली. शपथ घेण्याची ही पध्दत चुकीची ,घटनाबाह्य, बेकायदेशीर आहे. घटनेत आणि तिस-या शेड्युल्ड च्या शपथ घ्यावयाच्या फॉर्म आणि फॉरमॅट नुसार ‘ मंत्री’ असाच उल्लेख आहे; ऊपमुख्यमंत्री असा नाही. मात्र मा. राज्यपालांनी शपथ देताना उपमुख्यमंत्री हा शब्द वापरला, तर फडणवीस यांनी शपथ घेताना उपमुख्यमंत्री शब्द वापरला. हे कृत्य घटनेच्या 164/3 कलमाच्या आणि श्येड्युल v आणि vi यांचे उल्लंघन आहे व ते घटनाबाह्य आहे. यात राष्ट्पती यांनी हस्तक्षेप करून मा. राज्यपालांच्या घटनाबाह्य कृत्याची गंभीर नोंद घ्यावी आणि फडणवीस यांची शपथविधी प्रक्रिया रद्द करून, पुढील कार्यवाही करावी. अशी विनंती संजय लाखे पाटील यांनी केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: