fbpx

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर

पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच पुणे दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतरचा हा पुण्यातला पहिलाच जाहीर कार्यक्रम असेल. या दौऱ्यामध्ये ते पुण्यातल्या प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीची आरतीही करतील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी ते हांडेवाडी इथं एका फुटबॉल मैदानाचं उद्घाटन करतील. शिंदे गटात सामील झालेले माजी नगरसेवक नाना भानगिरे यांच्या निधीतून हे मैदान उभारण्यात येणार आहे. या मैदानाचं उद्घाटन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
त्यानंतर संध्याकाळी मुख्यमंत्री शिंदे पुण्यातल्या प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट देतील. गणपतीची महाआरती एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे पुण्यात जाहीर कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: