fbpx

सुनिता वाडेकर यांनी केली बोपोडी येथील मेट्रो कामाची पहाणी

पुणे:*प्रभाग क्रमांक ११ बोपोडी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील जुना मुंबई पुणे रस्ता येथे मेट्रोचे काम चालू असल्याने ५३/५४ देऊबाई चाळ,बोपोडी येथे जाणारा रस्ता या कामामुळे तसेच सततच्या पावसामुळे चिखलमय झाल्याने नागरिकांस व विद्यार्थ्यांस ये जा करण्यास येणारी अडचण लक्षात घेऊन *रिपाई नेते मा.परशुराम वाडेकर यांनी महा मेट्रो कार्पोरेशनचे अधिकारी* यांना त्या ठिकाणाची पाहणी करण्याची सूचना देऊन सदर काम तातडीने मार्गी लावावे असे सुचवले असता,महा मेट्रोचे अधिकाऱ्यांनी लवकरच हे काम सुरू करून काम चालू करण्याचे आदेश संबंधित ठेकेदारांस दिले आहे.याच अनुषंगाने मा.उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर आणि पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली.
यावेळी उपमहापौर सुनिता वाडेकर,व रिपाई नेते मा.परशुराम वाडेकर,महा मेट्रोचे अधिकारी,पुणे महानगरपालिकेचे संबंधित खात्याचे अधिकारी,व रिपाई कार्यकर्ते रुपेश पिल्ले,रिपाई बोपोडी ब्लॉक अध्यक्ष नंदाताई निकाळजे,आतिश कांबळे समीरभाई मनियार,सादिकभाई शेख आदी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: