fbpx

झूमकारने भारतात पार केला १ दशलक्ष एअरपोर्ट ट्रिप्सचा टप्पा

मुंबई : झूमकार या उदयोन्मुख बाजारपेठांमधील कार शेअरिंगसाठी आघाडीच्या बाजारस्थळाने आज भारतात १ दशलक्षहून अधिक एअरपोर्ट ट्रिप्सचा टप्पा पूर्ण केल्याची घोषणा केली आहे. प्रवासावरील निर्बंध आता हटवण्यात आले असल्यामुळे झपाट्याने वाढत असलेले अतिथीवर्ग विमानतळांपासून झूमकारच्या त्रासमुक्त सेल्फ-ड्राइव्ह पर्यायांच्या सोयीसुविधेचे कौतुक करत आहेत. सुट्टीनिमित्त मौजमजा करायला जायचे असो, हिल स्टेशन ड्राइव्ह्स, कुटुंबांना भेट, मित्रांसोबत रोड ट्रिप्स किंवा बिझनेस ट्रिप्स असो झूमकार अतिथींनी कार्स बुक करण्याचा आनंद घेतला आहे, ज्यामधून संस्मरणीय ड्रायव्हिंग अनुभव मिळाला आहे.

झूमकार भारतभरातील ३० हून अधिक विमानतळांवर एअरपोर्ट टर्मिनल डिलिव्हरी व पिक-अपची सुविधा देते. चेन्नई, दिल्ली, मुंबई व बेंगळुरू येथील प्रमुख महानगरीय विमानतळांचे झूमकारवर एअरपोर्ट बुकिंग्‍जमध्ये ६० टक्क्यांहून अधिक योगदान आहे. २६ ते ३५ वर्षे वयोगटातील अतिथींचे एअरपोर्ट बुकिंग्जमध्ये सर्वाधिक प्रमाण आहे आणि झूमकारवर एअरपोर्ट बुकिंग्ज करणारे बहुतांश अतिथी त्यांचा कारचा विविध दिवसांच्या ट्रिप्ससाठी वापर करतात.

झूमकार बाजारस्थळावर २०,००० हून अधिक ७-आसनी एसयूव्ही, सेदान्स, हॅचबॅक्स आणि इतर कार्स आहेत, जे देशभरातील अतिथींना अविश्वसनीय वैविध्यपूर्ण सुविधा देतात. भारतातील अतिथींनी झूमकारवर बुक केलेल्या कार्समधून ८०० दशलक्षहून अधिक किलोमीटर अंतर प्रवास केला आहे.

झूमकार इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निर्मल एनआर  म्हणाले, “झूमकारचे कार शेअरिंग बाजारस्थळ व्यक्तींना भारतभरात वाहनांची सर्वात वैविध्यपूर्ण श्रेणी उपलब्ध करून देते आणि आम्हाला घोषणा करताना आनंद होत आहे की, आम्‍ही भारतात १ दशलक्षहून अधिक एअरपोर्ट ट्रिप्सचा टप्पा पार केला आहे. मागील ६ महिन्यांत एअरपोर्ट बुकिंगजमध्ये प्रचंड वाढ दिसण्यात आली आहे. कार्स झूमकारच्या खात्रीदायी डिलिव्हरीच्या वचनासह येतात, अन्यथा झूमकार दुप्पट रिफंड देते. स्थिर गतीने होत असलेल्या आमच्या विकासामधून भारतातील शहरी गतीशीलतेशी संलग्न आव्हानांचे निराकरण करण्यासाठी स्थानिकीकृत सोल्यूशन्स निर्माण करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.”

Leave a Reply

%d bloggers like this: