fbpx

‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत’ मराठीचा डंका

दिल्ली : 68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2020 आज जाहीर झाले. यामध्ये ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. तर गायक राहुल देशपांडे यांना ‘मी वसंतराव’ या चित्रपटाच्या पार्श्वगायनांसाठी सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार जाहीर झाला. ‘गोदाकाठ’ आणि ‘अवांछित’ या चित्रपटांसाठी अभिनेते किशोर कदम यांना विशेष ज्युरीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा स्पेशल ज्युरी मेंशन अवॉर्ड ‘जून’ चित्रपटासाठी सिध्दार्थ मेनन याला जाहीर झाला.

कामाची दखल घेतली गेली – – किशोर कदम (अभिनेता)  

“राष्ट्रीय पातळीवर आपल्या कामगिरीची नोंद घेतली गेली याचा आनंद झाला. दोन चित्रपटांतील कामाची दखल घेतली गेली. दोन्ही चित्रपटांमध्ये मी मन लावून काम केलं.

ध्येय गाठण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना मिळालेला पुरस्कार – राहुल देशपांडे

“‘मी वसंतराव’ या चित्रपटाला एक सोडून दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे. एक अनमोल भावे यांना साउंड डिज़ाइनिंगसाठी आणि दुसरा उत्कृष्ट पार्श्वगायनासाठी मला मिळाला आहे. चित्रपटासाठी ही एक मोठी गोष्ट आहे. वसंतरावांचे आयुष्य लोकांसमोर यावे, त्यांचा संघर्ष लोकांना कळावा, यासाठी चित्रपट निर्माण करताना आम्ही आठ वर्षे संघर्ष केला. मला वाटते हा चित्रपट ही एक प्रेरणा आहे. आपल्या समोर एखादे ध्येय असेल, तर ते साध्य करण्यासाठी आपल्याला कितीही अडथळे आले, तरी त्यावर मात करून आपण कसे पुढे जाऊ शकतो. ही गोष्ट या चित्रपटाच्या माध्यमातून समोर येते. त्या प्रयत्नासाठी मला हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, असे मला वाटते.”

 पुरस्कार माझ्या वडिलांना समर्पित करते – सायली संजीव अभिनेत्री 

“‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. चित्रपटातील कामाचे चीज झाले आहे. चित्रपटासाठी मी विशेष मेहनत घेतली आहे. मी हा पुरस्कार माझ्या वडिलांना समर्पित करते.”

स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटतेय – सिद्धार्थ मेनन (अभिनेता) 

“मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद होतोय. स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटतेय. हा पुरस्कार मी आमच्या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला समर्पित करतो. मला ‘जून’ चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला याचा सर्वात जास्त आनंद आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: