संभाजी ब्रिगेडच्या तक्रारी नंतर महापुरूषांवरच्या प्रतिमांवरील पेंडॉल हटवला
पुणे : पुणे रेल्वे स्टेशन, गेट नं १ वर छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आहेत. मात्र, चुकीच्या पद्धतीने पेंडॉल टाकल्याने त्यांचे चेहरे झाकले गेले होते. ही बाब संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी निदर्शनास आणून देताच, पुणे पोलिस आणि रेल्वे प्रशासनाने यांची दाखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चेहऱ्यावर आलेला पेंडॉलचा भाग हटवला आहे.


अधिक माहिती अशी की, पुणे रेल्वे स्टेशन, गेट नं १ वर छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आहेत. मात्र, चुकीच्या पद्धतीने पेंडॉल टाकल्याने त्यांचे चेहरे दिसत नव्हते. ही बाब संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी काल रात्री साडे अकरा वाजता बंडगार्डन पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस डांगे साहेब यांच्या निर्दशनास आणून दिली. डांगे यांनी त्वरित रेल्वे प्रशासनला संपर्क करून मंडप काढण्याच्या सुचना केल्या, आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटोवर आलेली झालर आणि अँगल काढण्यात आले. डांगे साहेब यांनी तक्रारीची दखल घेऊन त्वरित कारवाई केल्यामुळे संभाजी ब्रिगेडला रेल्वे प्रशासनाशी करावा लागणारा संघर्ष टळला. त्याबद्दल बंडगार्डन पोलीस स्टेशन येथील कर्तव्यदक्ष पोलीस डांगे साहेब यांचे संभाजी ब्रिगेड च्या वतीने आभार मानन्यात आले आहेत. तसेच पुणे रेल्वे स्टेशन प्रशासनाने येथून पुढे जाणीवपूर्वक महापुरुषांच्या प्रतिमेचे विटंबना केल्यास त्यांना संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने उत्तर देण्यात येईल, असा इशारा रेल्वे प्रशासनाला संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी दिला.
