Sunday, September 6, 2026
Latest NewsPUNE

पुणे महापालिका निवडणुकीत १०० हून अधिक भाजपचे नगरसेवक निवडून आणणार – जगदीश मुळीक

पुणे : राज्यातील जनतेने मागील अडीच वर्षात महाविकास आघाडीचे सरकार पाहिलं आहे. त्या संपूर्ण कालावधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार घडला. त्यामुळे त्यांचे दोन मंत्री गजाआड झाले. तर अनेक मंत्री त्याच मार्गावर आहेत. यामुळे येणार्‍या पुणे महापालिका निवडणुकीत १०० हून अधिक भाजपचे नगरसेवक निवडून आणण्याचा आमचा निर्धार आहे, असे मत भाजपाचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस असल्याने, पुणे शहरात भाजपाकडून विविध भागात आरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे. त्याच दरम्यान भाजपा शहर कार्यालयात युवा मोर्चाकडून काही निवडक छायाचित्राच प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्धाटन भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरचिटणीस राजेश येणपुरे, बापू मानकर, लालजी मिश्रा, प्रतिक देसरडा, दिपक पवार, अभिजित राऊत, ओमकार केदारी, राजू परदेशी यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading