कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का
सातारा : सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसराला आज दुपारी भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. भूकंपाची तीव्रता 3.3 रिश्टर स्केल इतकी होती. आज (दी. 22) दुपारी 1 वा. च्या सुमारास हा धक्का बसल्याची बातमी होती. मात्र याला कोणीही अधिकृत दुजोरा दिला नव्हता. मात्रा आता कोयना धरण व्यवस्थापनाकडून सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या बातमीला दुजोरा दीला आहे. दरम्यान, भूकंपाच्या या धक्क्यामुळे कोयना धरणास कोणताही धोका नसल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.
