Sunday, September 6, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

ओबीसींना न्याय… राजकीय भविष्यावरील टांगती तलवार दूर – पांकजा मुंडे

मुंबई: राज्यातील निवडणुका आता ओबीसी आरक्षणानुसार होणार आहेत. ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण देण्याचा फैसला सर्वोच्च न्यायालयात झाला. निवडणूक आयोगाने लवकरात लवकर निवडणुका घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तसेच ३३७ ठिकाणी निवडणुका घ्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या निर्णयानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.

“‘ओबीसी आरक्षण’ स्वागत स्वागत स्वागत… आतुरतेने प्रतीक्षा करणार्‍या समस्त ओबीसींना न्याय. राजकीय भविष्यावरील टांगती तलवार दूर. सरकारचे आभार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत.”, असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

 

दरम्यान उर्वरित निवडणुकांचा कार्यक्रम दोन आठवड्यांत जाहीर करा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तसेच बांठिया आयोगाच्या अहवालानुसार निवडणुका घ्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. ओबीसी आरक्षणाबाबतीत कोर्टाचा हा सर्वांत मोठा निर्णय आहे. माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया आयोगाने केलेल्या सर्वेक्षणानुसार ओबीसींच्या लोकसंख्येबाबत आक्षेप घेण्यात आला होता. आज कोर्टाने याच सर्वेक्षणानुसार निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading