fbpx

युतीसाठी उद्धव ठाकरे यांची मोदींसोबत एक तास चर्चा, खासदार राहुल शेवाळेंचा गौप्यस्फोट

नवी दिल्ली : महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतरही उद्धव ठाकरे युतीसाठी प्रयत्नशील होते, असा गौप्यस्फोट खासदार राहूल शेवाळ यांनी केला आहे. ते म्हणाले की, २१ जून २०२१ मध्ये उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एक तास चर्चा केली. मात्र ही चर्चा सफल होऊ शकली नाही, 

शिवसेनेच्या १२ खासदारांनी आज शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यानिमित्ताने या खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत १२ खासदारांनी भूमिका जाहीर केली.

लोकसभेतील गटनेता बदलावा अशी विनंती करण्यात येत होती. मात्र, गटनेता बदलला गेला नाही. परंतु, लोकसभेच्या प्रतोद भावना गवळी यांना गटनेता बदलण्याचा पूर्ण अधिकार असल्याने त्यांनी गटनेता बदलला, असं स्पष्टीकरण शिवसेना खासदार राहूल शेवाळे यांनी दिलं आहे. तसेच, शिवसेना अजूनही एनडीएतच आहे, असंही ते म्हणाले. १२ खासदारांनी आज शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यानिमित्ताने या खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केली. 

Leave a Reply

%d bloggers like this: