मुंबईचे निवृत्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडी ने केली अटक
नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने अटक केली आहे. संजय पांडे यांची ईडीकडून चौकशी सुरू असून ईडीने त्यांना आज दिल्लीमध्ये अटक केली आहे. एनएसई फोन टॅपिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली .२००९ ते २०१७ या काळात पांडेंनी बेकायदेशीर पद्धतीने फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. ५ जुलै रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय पांडेंची ईडीने चौकशी केली होती.संजय पांडे यांनी २००१ मध्ये पोलीस खात्यातून राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही आयटी कंपनी सुरु केली होती. २००६ मध्ये पांडे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले, त्यावेळी त्यांनी आपली आई आणि मुलाला कंपनीचे संचालक केले. पांडेंच्या कंपनीला एनएसईचे सर्व्हर, संगणकीय यंत्रणा आणि माहिती तंत्रज्ञान वापरण्यात आले. चित्रा रामकृष्ण यांच्या काळात झालेला एनएसईतील गैरव्यवहार लेखापरीक्षणात का उघड झाला नाही, याची चौकशी करण्यात आली.
