तो मॅटिनी शो आता बंद झालाय एकनाथ शिंदेंची राऊत यांच्यावर टीका
नवी दिल्लीः आणखी कोणी बोललं असतं तर दखल घेण्यासारखं होतं. पण सकाळी जो मॅटिनी शो असायचा पूर्वीचा तो बंद झाला आहे. मला त्यावर बोलण्याची आवश्यकता वाटत नाही. कारण ते दखल घेण्यासारखं नाही, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांवर निशाणा साधलाय.
एकनाथ शिंदेंनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. ईडीच्या कारवाईबाबतीत आमचे गटनेते बोलतील, पण मी सांगतो आणखी कोणी बोललं असतं तर दखल घेण्यासारखं होतं. पण सकाळी जो मॅटिनी शो असायचा पूर्वीचा तो बंद झाला आहे. मला त्यावर बोलण्याची आवश्यकता वाटत नाही. कारण ते दखल घेण्यासारखं नाही. तुम्हालाही माहीत आहे, पण तुम्हाला रोज काही ना काही बातम्या हव्या असतात, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत.
त्यांचं मॅटर जे होतं ते कोर्टात आहे. कोर्टानं त्या बाबतीत त्यांच्या बाजूनं निर्णय दिलेला आहे. त्यामुळे आमच्या सरकारनं त्यांना कुठलीही क्लीन चिट दिलेली नाही. खासदार 20 ते 22 लाख मतांमधून निवडून आलेले आहेत. एक ग्रामपंचायत सदस्य आणि नगरसेवकही इकडे तिकडे जाताना खूप विचार करतो. आज याचा विचार करण्याची आवश्यकता आहे, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावलाय.
