fbpx

रघुनाथ कुचिक जामीन अर्ज पोलिसांनी रद्द करावा- चित्रा वाघ

पुणे,:पीडित मुलगी बलात्कार प्रकरणी शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांची पोलिसांनी 376 कलम नुसार जामिनावर सुटका केली आहे. हा जामीन अर्ज पोलिसांनी रद्द करावा आणि पोलिसांनी योग्य ते या घटनेचा तपास करावा अशी मागणी भाजपच्या प्रदेशाध्यक्ष व नेत्या चित्रा वाघ यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली.

राज्यात एकनाथ शिंदे गटाचे व भाजपचे नवीन सरकार आलेले आहे. त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मंत्री मंडळामध्ये पूजा चव्हाण प्रकरणात क्लीन चीट मिळालेले आमदार
संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे त्यावर चित्रा वाघ म्हणाल्या माझी आजही भूमिका तीच आहे सरकारमध्ये कोणाला मंत्री पद भेटणार याची अजून षटता झालेली नाही.
मी माझी लढाई चालूच ठेवणार असे चित्रा वाघ म्हणाल्या.
सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आपल्यासोबत पुण्यातील डेक्कन भागातील एका हॉटेलमधे, मुंबईतील खेतवाडी भागातील एका हॉटेलमधे, सोलापूरमधील शासकीय विश्रामगृहात आणि सांगलीतील खासदार संजय पाटील यांच्या हॉटेलमधे वेळोवेळी शरीर संबंध ठेवल्याचे पिडीत महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. त्यामुळे श्रीकांत देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. त्यावर चित्रा वाघ म्हणाल्या, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व भाजपचे वरिष्ठ नेते यांनी घेतल्या निर्णया
नुसार श्रीकांत देशमुख यांनी राजीनामा दिला असे वाघ म्हणाल्या. पिडीत महिलेला माझे आव्हान आहे की तिने श्रीकांत देशमुख यांची काही चुकी झाली असेल तर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करावी. असे चित्रा वाघ म्हणाल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: