fbpx

ठिपक्यांची रांगोळी मालिकेत अभिनेत्री विशाखा सुभेदारची एन्ट्री

स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अप्पू आणि शशांकने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण कानेटकर फॅमिली अपूर्वा शशांकचा घटस्फोट थांबवण्यासाठी प्रयत्न करत असताना आता मालिकेत एका नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. दमयंती दुधखुळे असं या पात्राचं नाव असून ती विवाह सल्लागार असेल. अभिनेत्री विशाखा सुभेदार दमयंती दुधखुळे ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.

ठिपक्यांची रांगोळी मधील या भूमिकेविषयी  सांगताना विशाखा सुभेदार म्हणाल्या, ‘मालिकेच्या नावाप्रमाणेच या मालिकेत मी एक छोटासा ठिपका असेन जो शशांक आणि अपूर्वाच्या नात्यात प्रेमाचे रंग भरण्याचा प्रयत्न करणार आहे. दमयंती दुधखुळे नावावरुनच ही व्यक्तिरेखा विनोदी असेल याचा अंदाज येतो. अतिशय भन्नाट व्यक्तिरेखा आहे. अप्पू-शशांकला एकत्र आणण्याच्या प्रयत्नात ती तिच्या आयुष्यातील गुंताही सोडवते. त्यामुळे प्रेक्षकांना ही भूमिका नक्कीच आवडेल. तेव्हा पाहायला विसरु नका ठिपक्यांची रांगोळी रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’

 

Leave a Reply

%d bloggers like this: