fbpx

त्यांचे गैरसमज दूर होतील आणि पुन्हा प्रवाह एक होईल – डॉ. नीलम गोऱ्हे

 

पुणे : आम्ही आधीपासून 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करत आलो आहोत. पण आता राजकारणाचा प्रांत वाढला आहे. कारण त्यात मोठे वादविवाद सुरू आहेत. मी भगवद्गगीतेवर विश्वास ठेवणारी आस्तिक आहे. त्यामुळे जे गेलेले आहेत, त्यांचा शोक करायचा नाही. आपल्यातून जे दुसरीकडे गैरसमजातून गेले असतील, त्यांचे गैरसमज दूर होतील आणि पुन्हा एकदा नदीचा प्रवाह सुरू होईल., असा  विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते साडेचार हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्यचा वाटपचा शुभारंभ आज( करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक राजू पवार यांनी केले होते. यावेळी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे उपस्थित होते.

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “त्या सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार शक्य होईल तेव्हा करावा, कायदा नेमका काय आहे ते सर्वच न्यायालय सांगत असते. पण आम्ही सांगतो तो कायदा अशा पद्धतीने जर कोणाचा अविर्भाव असेल तर तो फार काळ काही टिकत नाही हा माझा अनुभव आहे.” असे सांगत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. 

बंडखोर आमदाराना उद्देशून त्या पुढे म्हणाल्या की, “बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार करून जल्लोष करतात, त्यांच्या निष्ठेबाबत मी काय बोलणार.” तसेच, “जे आज माझ्यावर टीका करतात, त्यांना जर परत कधी यायचं असेल, तर ताईच्या आपण लक्षात राहाव हाच, या मागील हेतू असणार.” असल्याचं सांगत टीका करणार्‍यावर त्यांनी निशाणा साधला.

दरम्यान, येत्या 27 जुलैला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसा निमित्त  दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. 

Leave a Reply

%d bloggers like this: