fbpx

माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

मुंबई: शिवसेनेतील बंडानंतर आता बंडखोर नेत्यांची पक्षातून हकालपट्टी सुरू आहे. शिवसेनेच्या पुनर्बांधणीसाठी आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बंडखोर नेत्यांवर कठोर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

आज शिवसेना नेते माजी मंत्री आणि पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे शिवसेनेचे अधिकृत मुखपत्र असणाऱ्या सामनातून ही माहिती देण्यात आली.

शिवतारे यांनी 2009 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता त्यानंतर 2009 व 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सुंदर हवेली विधानसभा मतदार संघातून ते निवडून आले होते 2014 मध्ये फडणवीस सरकार मध्ये जलसंपदा जलसंधारण या खात्याचा राज्यमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार पाहिला होता त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देखील त्यांच्याकडे जबाबदारी होती. शिवतारे यांच्या हकालपट्टीने पुरंदर तालुका शिवसेनेला मोठा खिंडार पडलं असल्याच्या राजकीय चर्चा सुरू आहेत

Leave a Reply

%d bloggers like this: