fbpx

राज्यात पावसाचा ‘Time please’

पुणे : राज्यात गेल्या आठवडाभरापेक्षा जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र आज (दी. 15) पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. आज दिवसभर राज्यात सर्वच ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला. मात्र उद्यापासून (दी. 16) पुन्हा हवामानात बदल होण्याची शक्यता भारतीत हवामान खात्याने (IMD) वर्तविली आहे.   

मागील दोन दिवस IMD ने राज्यात कोकण, नाशिक, पुणे यांसह मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला होता. मात्र घाटमाथे वगळता इतर ठिकाणी दिवसभर अधून मधून संततधार पाहायला मिळाली. गुरुवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत घाटमाथ्यावरील शिरगाव येथे सर्वाधिक 312 मिमी. पावसाची नोंद झाली. तर आज पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे.

भारतीत हवामान खात्याने (IMD)दिलेल्या माहिती नुसार, दक्षिणेकडे असलेला मान्सूनचा आस, राज्याच्या मध्यभागावर पुर्व-पश्चिम दिशेने वाहणारे परस्पर विरोधी वारे यांचे जोड क्षेत्र या प्रणाली सक्रिय आहेत. तसेच अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे यांच्यामुळे राज्यात जोरदार पाऊस पडत होता. त्यातच आता मान्सूनचा आस उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असून पुर्व किनाऱ्याला असलेले कमी दाबाचे क्षेत्र ओसरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पुढील तीन चार दिवसांमध्ये राज्यात पुन्हा हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: