मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मला खूप काळजी वाटते – सुप्रिया सुळे
पुणे : राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांनी कागदावर काहीतरी मजकूर लिहून दिला. त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बिचारे आहेत. यामागे मोठे षडयंत्र आहे, त्यामुळे मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खूप काळजी वाटते असे राष्ट्रवादीचे नेत्यां व खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान, पुणे महानगरपालिका समाज विकास विभागमार्फत महिला बचत गटातील महिलांसाठी विविध कोर्सेस शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमा वेळी सुप्रिया सुळे यांनी राज्यातील आणि देशातील राजकीय स्थितीवर भाष्य केले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रॉम्पटींग करणे, चिठ्ठी देणे यासह त्यांना कमी दाखवण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. सध्या अडचणीत आलेले शेतकरी, नागरिक यांच्यासाठी या सरकार ने कामे करावे. तसेच ‘ज्यांच्याकडे एक आमदार आहे त्यांच्या घरी १०५ आमदार असलेले मंत्री जातात’, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी भाजपला लगावला.
पुढे बोलताना सुळे म्हणाल्या, दिपक केसरकर यांच्या बरोबर मी खूप वर्ष कामे केले आहेत. त्यामुळे मला मुख्यमंत्र्यांची चिंता आहे. सध्या कोण कुठल्या पक्षात आहे हे आजकाल कळतच नाही. मी स्वतः गोंधळात आहे. सध्या राज्यात जे राजकारण जे चाललं आहे ते महाराष्ट्राला शोभत नाही.
काल राज्य शासनाने संरपंच आणि नगराध्यक्ष ही पदे प्रत्यक्षरित्या जनतेतून निवडली जातील, अशी घोषणा केली. यावर बोलताना सुळे म्हणाल्या, सरपंच आणि सदस्या बॉडी वेगळी झाली तर एकत्र चर्चा होत नाही. त्यामुळे याचा वाईट परिणाम होईल. राजकारण म्हणजे व्यवसाय नाही. लोकांकडून पैसे घेणे, धमक्या देणे हे राजकारण नाही, असंही खासदार सुळे म्हणाल्या.
