fbpx

कुशल क्रेडाई’तर्फे ११ वर्षांत एक लाखाहून अधिक बांधकाम कामगारांना कौशल्य प्रशिक्षण

पुणे  :  बांधकाम कामगारांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण राबवित कुशल क्रेडाई’ने गेल्या ११ वर्षांत तब्बल एक लाखाहून अधिक बांधकाम कामगारांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. बांधकाम कामगारांसाठी अशाप्रकारचे शास्रीय प्रशिक्षण उपक्रम राबविणारे कुशल क्रेडाई ही पहिली संस्था ठरली आहे.

याबाबत कुशल आणि क्रेडाई पुणे मेट्रोच्या कामगार कल्याण समितीचे अध्यक्ष  जे.पी. श्रॉफ म्हणाले, “ २०१०  मध्ये जेव्हा नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कोर्पोरेशन  (एनएसडीसी) ची स्थापना झाली, तेव्हा क्रेडाई पुणे मेट्रोने २००० बांधकाम कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी क्रेडाई नॅशनलच्या वतीने प्रस्ताव देण्याचा निर्णय घेतला.  क्रेडाईचे अध्यक्ष सतीश मगर यांच्या कार्यकाळात एनएसडीसीने आमचा प्रस्ताव मंजूर केला आणि अशा प्रकारे कुशल ही क्रेडाई नॅशनलची प्रशिक्षण शाखा सुरू झाली. याअंतर्गत आतापर्यंत 1 लाखाहून अधिक कामगारांना बांधकाम क्षेत्र कौशल्य परिषद’द्वारे मान्यता दिलेल्या विविध ब्रिज कोर्सेसमध्ये प्रशिक्षण दिले आहे. यासाठी क्रेडाई पुणे कुशलच्या आदेशाने आम्हाला प्रशिक्षणाचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र विकसित करावे लागले. तसेच विविध कौशल्यांच्या प्रशिक्षणाची संपूर्ण पुस्तिकाही तयार करण्यात आली होती. असे यापूर्वी कधीही केले गेले नव्हते.’’

एनएसडीसीचे तत्कालीन अध्यक्ष रामादोराई यांनी पुण्यातील प्रशिक्षण केंद्राला भेट दिली. याठिकाणी प्रशिक्षणपद्धत आणि त्याचा परिणाम पाहून ते अत्यंत प्रभावित झाले. इतकेच नव्हे, तर अजित गुलाबचंद अध्यक्षतेखालील बांधकाम क्षेत्र कौशल्य परिषदेच्या मंडळावर माझी नियुक्ती करण्यात आली, असेही श्रॉफ यांनी सांगितले.

भविष्यातील योजनांबाबत माहिती देताना जे.पी.श्रॉफ म्हणाले,” ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रिया आणि इटली येथे होणाऱ्या टाइलिंग आणि ब्रिकलिंग या जागतिक स्पर्धांमध्ये कुशल’च्या दोन टीम सहभागी होणार आहेत. यंदा या टीम उकृष्ट कामगिरी करतील असा आमचा विश्वास आहे. त्याचबरोबर तरुण इंजिनीअर्ससाठी आम्ही ‘अपस्किलिंग’ अर्थात कौशल्य वृद्धी प्रशिक्षण आयोजित करणार आहोत. बांधकाम उद्योगासाठी सज्ज असलेले कामगार घडविण्यासाठी आम्ही एमआयटी विद्यापीठासोबत विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करत आहोत. त्याचबरोबर भारत सरकारच्या सहयोगाने आम्ही आणखी तीस हजार कामगारांनी आरपीएल अर्थात रिकगनाईज्ड प्रायोर लरनिंगअंतर्गत कौशल्य विकासाचे प्रशिक्षणसाठी नावनोंदणी केली आहे.”

कामगारांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण राबविणाऱ्या कुशल क्रेडाई पुणे संस्थेला विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.  यामध्ये खालील पुरस्कारांचा समावेश आहे.

– यूके इंडिया स्किल्स फोरम अवॉर्ड 2011

– बांधकाम कौशल्य विकासासाठी सीआयडीसी विश्वकर्मा पुरस्कार

– बिझनेस इनोव्हेशन अवॉर्ड 2013

– एनएसडीसी पुरस्कार: सर्वोत्कृष्ट अनुपालन प्रशिक्षण भागीदार 2014

– टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस लीप व्हॉल्ट सीएलओ पुरस्कार 2013 आणि 2014 मध्ये दोनदा जिंकले.

– ई -इंडिया पुरस्कार 2013

– सीएसआर श्रेणीमध्ये आर्थिक समावेश आणि पेमेंट सिस्टमसाठीचा एफआयपीएस  पुरस्कार 2014.

– 7 वा सीआयडीसी विश्वकर्मा पुरस्कार 2015

– गोल्डन ग्लोब टायगर्स पुरस्कार 2015

– भारत सरकारचा राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार 2014-2015.

Leave a Reply

%d bloggers like this: