fbpx

पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर यांची निवडही जनतेतूनच करा -चंद्रशेखर घाडगे

पुणे:“सरपंच, नगराध्यक्षांची निवड जनतेतून होणार आहे हा निर्णय योग्यच आहे, आता सरपंच, नगराध्यक्ष निवड करताना सदस्यांची जुळवा जुळवी करताना जो घोडेबाजार चालायचा तो बंद होईल, पण आमची राज्यसरकारकडे मागणी आहे, पंचायतसमिती सभापती , जिल्हापरिषद अध्यक्ष, महापौर यांची निवड सुद्धा जनतेतूनच करावी तसा आपण त्वरीत निर्णय घ्यावा, कारण सरपंच, नगराध्यक्ष, यांची निवड जनतेतून होऊ शकते तर पंचायतसमिती सभापती, जिल्हापरिषद अध्यक्ष, महापौर यांची निवड जनतेतून करण्यासाठी काहीच अडचण नाही. अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी केली आहे.
चंद्रशेखर घाडगे म्हणाले, उलट महापालिका, जिल्हापरिषद, पंचायतसमिती मधील सदस्यांची फोडाफोडी आणि पैशांचा घोडेबाजार होणार तर नाहीच पण जनतेला जो हवा आहे तो वेक्तीच त्या खुर्चीवर बसल्या नंतर विकास काम वेगाने होईल, राज्यसरकारने आमच्या मागणीची दखल घेऊन त्वरित निर्णय घ्यावा. तो मतदार जनतेच्या हिताचाच निर्णय असेल. असे चंद्रशेखर घाडगे म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: