fbpx

संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी उत्पन्न दाखल्याच्या शिबिराचे आयोजन

पुणे: शहर तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून कसबा मतदारसंघात संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी उत्पन्न दाखल्याच्या विशेष शिबिराचे कार्यक्रमाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,चे प्रवक्ते प्रदीप देशमुख ह्यांच्या हसते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले कसबा विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष दीपक पोकळे व संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती, कसबा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष रोहन पायगुडे यांनी सदर कार्यक्रमाचे संयोजन केले. याप्रसंगी प्गणेश नलावडे,निलेश वरे,अरुण गवळे,राहूल पायगुडे, मंजिरी कोठूळे,मच्छिंद्र उत्तेकर,राम पालखे, सुजित जगताप,हेमंत येवलेकर,संतोष बेंद्रे,बाळासाहेब आहेर,शशिकांत जगताप, प्रीती धोत्रे,प्रमोद जगताप,प्रभू पायगुडे आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संजय गांधी योजना समितीचे सदस्य विक्रम मोरे, सरिता काळे, संजय गायकवाड, सुरेश खाटपे, रमेश लडकत यांनी सहकार्य केले. सदर शिबिरात १४७ लाभार्थ्याना उत्पन्न दाखले देण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: