fbpx

पाल्यांना दान आणि ध्यानाचे संस्कार देण्याची गरज- डॉ. सत्येंद्र शुक्ला

पुणे: जो अंधारातून प्रकाशाकडे घेऊन घेऊन जाण्यासाठी सहाय्य करतात ते गुरू. आज भरकटलेल्या समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याची गरज आहे त्यासाठी प्रत्येकांने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. जर आपण प्रकाशमान समाजाची निर्मितीचे पाईक होत असाल तरच गुरु पौर्णिमाचा हा दिवस सार्थकी लागेल. असे विचार लामा डॉ. सत्येंद्र शुक्ला यांनी व्यक्त केले.

इंटरनॅशनल लामा फेरा हिलिंग ऑण्ड ट्रेनिंग रिसर्च सेंटर व लामा फेरा फाउंडेशन यांच्या वतीने भारतातील सर्वात मोठ्या लामा फेरा हिलिंग मॉनेस्ट्री मध्ये आज गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लामा फेरा हिलिंग गुरू, लामा डॉ. सत्येंद्र शुक्ला यांच्या हस्ते गुरुंच्या प्रतिमेचे पुजन करून उपस्थित अनुयायांना त्यांनी संबोधीत केले. गुरू आपल्याला जे ज्ञान देतात त्याची आवश्यकता आजच्या काळात प्रत्येक जनमानसाला आहे. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने लामा फेरा मॉनेस्ट्री मध्ये सर्व अनुयायांनी बुद्धांना वंदन तर साईबाबा यांची महाआरती करून महाबोधी ध्यान, लामा फेरा हिलिंग व महाप्रसादाचा लाभ घेतला.

लामा डॉ. सत्येंद्र शुक्ला म्हणाले, पालकांनी आपल्या पाल्यांना दान आणि ध्यान या दोन गोष्टींचे संस्कार देण्याची गरज आहे. ज्ञानामुळे मुले बौद्धिक विकास करून योग्यता मिळवतील तर दान करण्याच्या संस्काराने त्यांचा आत्मिक बल वाढेल व वाईट विचार आणि वर्तूनीकी पासून दूर राहतील.

यावेळी अनाथांची माय पद्मश्री स्व. सिंधूताई सपकाळ यांच्या संस्थेला आर्थिक सहकार्य म्हणून लामा फेरा फाउंडेशनच्या वतिने रूपये आकरा हजाराचा धनादेश संस्थेच्या विश्वस्तांना सुपूर्त करण्यात आला.

Leave a Reply

%d bloggers like this: