fbpx

महापालिका निवडणुक – अंतिम मतदार यादी तयार करण्याची मुदत आणखी पाच दिवसांनी वाढवली

पुणे: महापालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी तयार करण्याची मुदत आणखी पाच दिवसांनी वाढवली आहे. २१ जुलै पर्यंत ही मुदत देण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी २३ जून रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर झाली, त्यामध्ये मोठ्याप्रमाणात चुका असल्याने इच्छुक उमेदवार, मतदार, राजकीय पक्षांनी पावणे पाच हजार हरकती नोंदविल्या आहेत.
हरकतींची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी लागते. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय २५ जणांचे पथक तयार करण्यात आले होते. हे काम खूप किचकट व वेळखाऊ असल्याने महापालिकेने अंतिम मतदार यादी जाहीर करण्यासाठी मुदत वाढवून मागितली होती. त्यात १६ जुलै पर्यंतची मुदत दिली होती. शहरात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्याचाही परिणाम प्रारूप मतदार यादीतील हरकती पडताळणीच्या कामावर झाला आहे. त्यामुळे या कामासाठी आणखी एक मुदतवाढ द्यावी अशी मागणी महापालिकेने केली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने २१जुलै पर्यंत अंतिम मतदार यादी जाहीर करण्यासाठी मुदत दिली आहे. त्याबाबतचे पत्र महापालिकेला मिळाले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: