गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने डॉ पी. ए. इनामदार यांचा सन्मान
पुणे:डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत गौतम बुद्ध,संत कबीर, महात्मा जोतिराव फुले यांना गुरू मानले होते. सामाजिक व शैक्षणिक परिवर्तनाच्या चळवळीत काम करीत असताना परिवर्तनवादी विचार आवश्यक असतात. पुणे शिक्षणाचे माहेरघर आहे महात्मा फुले यांनी बहुजन समाजाला शिक्षणाचे दारे खुली केली. सावित्रीमाई व फातिमा शेख शिक्षिका म्हणून कार्यरत होते. शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर विश्वास ठेवून डॉ. पी. ए. इनामदार यांनी बहुजन अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये शिक्षण देण्यास सुरुवात केली व आजही कार्यरत आहेत. डॉ. पी. ए. इनामदारसरांनी शिक्षणरुपी लावलेलं छोट्याशा रोपाचे आज मोठ्या वृक्षांमध्ये म्हणजे डॉ पी इ इनामदार विद्यापीठ यामध्ये रुपांतरीत होत आहे. बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने बुद्ध गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने सन्मान करण्यात आला. यावेळी बसपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी डॉ हुलगेश चलवादी महाराष्ट्र प्रदेश महासचिव सुदीप गायकवाड पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड पुणे जिल्हा प्रभारी मेहमूद जकाते पुणे जिल्हा प्रभारी संजय शेंडगे मुस्लिम कॉ. बॅंकेचे संचालक लुकमान शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.