fbpx

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् तर्फे लोक तालवाद्य पदविका अभ्यासक्रम सादर

पुणे  : संगीत म्हंटले की आपल्याला मुख्य गायक किंवा वादक आणि त्याच्या सोबतीला काही वाद्ये आणि वादक असे काहीसे चित्र नेहमीच दिसून येते. मग ती मैफिल शास्त्रीय संगीताची असो, उपशास्त्रीय संगीताची असो, सुगम संगीताची असो वा लोक संगीताची असो सर्वदूर असेच काहीसे चित्र दिसून येते. साथीची वाद्येविरहीत मैफिल आपण कुणीही कदाचित कधीही ऐकलेली नसेल. यावरून साथसंगतीच्या वाद्यांचे महत्व लक्षात येऊ शकते. शास्त्रीय संगीतातील तबला आणि पखवाज ह्या ताल वाद्यांचा उपयोग साथसंगत मध्ये होत असतो. त्यांचे शिक्षण देखील गुरूंकडे, खाजगी संगीत शाळा, महाविद्यालय पातळीवर किंवा विद्यापीठीय पातळीवरहोत असते.

सुगम संगीत असो किंवा लोक संगीत असो त्यातहीअनेक वैविध्यपूर्ण ताल वाद्यांचा उपयोग होत असतो. त्यात प्रामुख्याने ढोलक, ढोलकी, संबळ, दिमडी, ढोल, ताशा, बगलबच्चा, चोघडा, नगारा, हलगी, मादल, चौंडक इत्यादी चर्मवाद्ये तसेच टाळ, मंजिरा, झांज, चिपळ्या, एकतारा,रेसोरेसो, कबास, मराकस इत्यादी साईड रीदम वाद्ये सांगता येतील.ही सर्व वाद्ये कार्यक्रमांमधून, ध्वनीमुद्रणांमधूनतसेचचित्रपट संगीतासाठी वाजवताना दिसून येतात. अनेक होतकरू विद्यार्थ्यांना ही वाद्ये शिकण्याची इच्छा असते. मात्र तसे औपचारिक शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध नव्हती. ही काळाची गरज ओळखून,विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् ने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून ‘लोक ताल वाद्याचा पदविका अभ्यासक्रम’ सुरु केलाआहे अशी माहिती भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् चे संचालक प्रा. शारंगधर साठे यांनी कळवली आहे.

तबला, पखवाज, ही वाद्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताबरोबरच सुगम संगीत, लोक संगीत, भक्ती संगीत,सिने संगीत या संगीत प्रकारांमध्ये वरील अभ्यासक्रम केल्यास साथ करण्यासाठीचे प्रशिक्षण मिळेल, या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताबरोबरच वर उल्लेखित सर्व संगीत प्रकारांना साथ करता येईल, ध्वनिमुद्रणामध्ये वाजवता येईल. खरे सांगायचे तर या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना अर्थार्जनाची अधिक जास्त संधी मिळणार आहे.

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये – या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा आहे. ढोलक, ढोलकी, संबळ, दिमडी, ढोल, ताशा, बगलबच्चा, चंडा, डफ, मादल इत्यादीचर्मवाद्यांचाअभ्यास, त्यांची वादन पद्धती, आवश्यक ठेके, वाद्याची संपूर्ण माहिती तसेच इतर साईड रीदम वाद्ये उदा – घुंगरू, टाळ, चिपळ्या, मराकस, रेसोरेसो, शंख, एकतारी इत्यादी सर्व वाद्यांच्या वादन पद्धातीचा अभ्यास या अभ्यासक्रमात करता येणार आहे. कार्यक्रमाच्या दृष्टीने ही वाद्ये कशी वाजवावी, त्यासाठी ध्वनी व्यवस्था कशी करावी, ध्वनिमुद्रण करताना ही वाद्ये कशी वाजवावीत,ताल संयोजन (Rhythm Arrangement)  कसे करावे, पार्श्वसंगीतासाठी कसे वादन करावे या सर्व घटकांचा अभ्यास या अभ्यासक्रमात करता येणार आहे.

श्रीमती लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर अशा अनेक मान्यवर कलाकारांबरोबर साथ करणारे प्रसिद्ध तालवाद्य वादक डॉ. राजेंद्र दूरकर,विविध संगीत प्रकारांमध्ये उत्तम साथ करणारे श्री. केदार मोरे, श्री. राजू जावळकर,देश विदेशात सात हजार पेक्षा जास्त कार्यक्रमांमधून विविध वाद्य वाजवण्याचा अनुभव असलेले श्री. अमोल बेलसरे,प्रसिद्ध संगीत संयोजक श्री. मिलिंद गुणे, श्री. आनंद कुऱ्हेकर, श्री. सचिन इंगळे तसेचबॉलीवूडफिल्म इंडस्ट्री मध्ये वादक म्हणूनवश्री. इलिया राजा सारख्या प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकांबरोबर काम करणारे श्री. शशांक जोशीअशा मान्यवर कलाकारांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे.  वर उल्लेखित सर्व मार्गदर्शक हे अनेक कार्यक्रमांचा, ध्वनिमुद्रणाचा, सिने संगीतात वाजवण्याचा प्रदीर्घअनुभव असलेलेआहेत.या सर्व अनुभवाचा विद्यार्थ्यांना भरपूरफायदा होणार आहे.खऱ्या अर्थाने हा अभ्यासक्रम व्यवसायाभिमुख आहे.

या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु असून http://spa.bharatividyapeeth.eduया संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज 30 जुलै 2022 पर्यंत भरायचे आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: