fbpx

Rain Alert – पुणे, पिंपरी-चिंचवडमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर

पुणे : शहर आणि जिल्ह्यात उद्या गुरुवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्यानं जारी केलेल्या रेड अलर्टमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील शाळा गुरुवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यात १४ जुलैरोजी हवामान खात्याने मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. या सोबतच रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. या मुसळधार पावसामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालीकेने सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे महापालिकेच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. मीनाक्षी राऊत आणि शिक्षणंधिकारी पोपट काळे यांनी या संबंधीचे पत्रक काढले आहे. तर पिंपरी – चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. 

दरम्यान, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा बंद ठेवण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी  दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: