fbpx

Savitribai Phule Pune University : स्तनाच्या कर्करोगाबाबतचा शोधनिबंध सादर

जैतंत्रज्ञान विभागातील दीपशिखा सिंग या विद्यार्थिनीचे संशोधनात योगदान

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जैव तंत्रज्ञान विभागातील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या दीपशिखा सिंग या विद्यार्थिनीने व जैव तंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक डॉ.राजेश गच्चे यांनी नुकताच एक शोधनिबंध सादर केला असून त्यांतर्गत स्तनाच्या कर्करोगाबाबत तिने महत्त्वपूर्ण निरीक्षणे सादर केली आहेत.

जागतिक नियतकालिक (जर्नल) ‘ड्रग रेजिस्टंट अपडेट ‘ यामध्ये हा शोधनिबंध सादर केला आहे. २२.८४ इम्पॅक्ट फॅक्टर असणाऱ्या इतक्या उत्तम नियतकालिकात शोधनिबंध प्रकाशित करणारी दीपशिखा सिंग ही विद्यापीठातील पहिली विद्यार्थ्यांनी ठरली असल्याचे डॉ.राजेश गच्चे यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. गच्चे म्हणाले, जागतिक कर्करोगांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग हा क्रमांक एक वर होता, मात्र अलीकडच्या काळात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले असून स्तनाचा कर्करोग एक क्रमांकावर आल्याचे पाहायला मिळत आहे. स्तनाच्या कर्करोगावर उपलब्ध असलेल्या औषोधोपचार पद्धतीला अनेक कारणांमुळे सध्या प्रतिबंध केला जात आहे. त्यापैकी ‘लॉग नॉन कोडींग आर एन ए ‘ या एका प्रमुख कारणामुळे या उपचार पद्धती आज स्तनाच्या कर्करोगावर निष्प्रभ असल्याचे प्रस्तुत संशोधनात दिसून आले आहे. या शोधनिबंधात या विषयावरील शास्त्रीय तथ्ये मांडली आहेत.

डॉ.राजेश गच्चे यांच्या प्रयोगशाळेत या समस्येवर मूलभूत संशोधन सुरू आहे. यासाठी ‘एसईआरबी डीएसटी’ दिल्ली या संस्थेने भरीव अर्थसहाय्य दिले आहे.

डॉ. गच्चे यांना नुकतेच रॉयल सोसायटी ऑफ मेडीसिन, लंडन यांनी मानद सदस्यत्व बहाल केले आहे. त्यानिमित्त डॉ. गच्चे यांच्याबरोबरच दीपशिखा हीचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार आदींनी कौतुक करत अभिनंदन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: